Menu Close

कतरास (झारखंड) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रेमी पत्रकारांसाठी ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ बैठक

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात क्षमतेनुसार सहभागी होऊ ! – पत्रकार

पत्रकारांसमवेत समितीचे श्री. शंभू गवारे (सर्वांत डावीकडे)

कतरास (झारखंड) : येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रेमी पत्रकारांची ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी उपस्थित वृत्तपत्र प्रतिनिधींना समितीच्या ‘राष्ट्र आणि धर्म’ यांविषयीच्या कार्याचा परिचय करून दिला, तसेच यासंबंधित दृश्यपट दाखवला. समितीचे कार्य पाहून पत्रकार प्रभावित झाले. ‘या कार्यात आम्ही आमच्या क्षमतेनुसार सहभागी होऊ आणि तुमच्या उपक्रमांना योग्यरित्या प्रसिद्धी देऊ’, असा मनोदय त्यांनी या वेळी व्यक्त केला. या बैठकीला ‘दैनिक प्रभात खबर’, ‘दैनिक भास्कर’, ‘दैनिक जागरण’ आणि ‘दैनिक आवाज’ या वृत्तपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *