Menu Close

पाकपासून आम्हाला स्वतंत्र करा ! – सिंधी समाजाची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी

पाकमधील आतंकवाद नष्ट करण्यासह भारताला पाकपासून असणारी डोकेदुखी कायमची नष्ट करण्यासाठी पाकचे सिंध, बलुचिस्तान, पश्तूनीस्थान प्रांत त्याच्यापासून स्वंतत्र करण्यासाठी आणि पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी हीच योग्य वेळ आहे !

ह्यूस्टन (अमेरिका) – पाकमधील बलुचिस्तानच्या नागरिकांच्या नंतर आता पाकमधील सिंध प्रांतातील सिंधी समाजाने त्यांना पाकपासून स्वंतत्र करण्याची मागणी केली आहे. अमेरिकेच्या दौर्‍यावर असणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सिंधी समाजाकडून ही मागणी करण्यात येत आहे.

१. येथील सिंधी कार्यकर्ते जफर यांनी म्हटले आहे की, वर्ष १९७१ मध्ये ज्याप्रमाणे भारताने पाकपासून बांगलादेशाला स्वतंत्र केले, त्याप्रमाणे भारताने सिंधलाही पाकपासून स्वतंत्र करण्यासाठी आम्हाला साहाय्य करावे. पाकिस्तानमधील सिंधी लोक येथे आले आहेत. जेव्हा मोदी येथील मार्गावरून जातील, तेव्हा आम्ही आमचा संदेश त्यांना सांगू की, आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे. आम्हाला आशा आहे की, मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आम्हाला साहाय्य करतील. पाकमध्ये आमचा नरसंहार होत आहे. आमचे अनेक अधिकारी ठार करण्यात आले आहेत.

२. सिंधी समाजाच्या एका प्रतिनिधीने सांगितले की, पाकिस्तानचे सरकार एक फॅसिस्ट आणि आतंकवादी सरकार आहे. तेथे मानवी मृतदेह विकले जातात. अल्पसंख्याकांना कोणतेही अधिकार दिले जात नाहीत. मोदी आणि ट्रम्प यांनी आम्हाला साहाय्य करावे. पाकिस्तानी सैन्य आणि आय.एस्.आय. यांना आतंकवादी घोषित करावे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *