Menu Close

हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे हिंदूंचे धर्मांतर करणारी एल्.आय.सी.ची महिला एजंट पोलिसांच्या कह्यात

हिंदूंच्या धर्मांतराची एकही संधी न सोडणार्‍या धर्मांध ख्रिस्त्यांना, तसेच बाटग्यांना प्रभावी उत्तर म्हणजे हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन स्वतःतील धर्माभिमान वाढवणे !

जबलपूर (मध्यप्रदेश) : विमा उतरवण्याच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या एल्.आय.सी.च्या सरोज या एजंटला पोलिसांनी कह्यात घेतले. हिंदूंच्या सतर्कतेमुळे तिच्या कारवाया उघड झाल्या. विमा उतरवण्याच्या बहाण्याने ती लोकांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेत होती. कमकुवत आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबाला धार्मिक पुस्तकांचे वाटप करून धर्मांतर करण्यास सांगत होती.

विश्‍व हिंदु महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. विकास खरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ही महिला साहू भागातील एका कुटुंबाला पैशांचे आमीष दाखवून कुटुंबातील सदस्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत होती. ही माहिती मिळताच विश्‍व हिंदु महासंघाने संबंधित कुटुंबाच्या घरी धाव घेतली आणि सरोजच्या विरोधात तक्रार करून तिला पोलिसांच्या स्वाधीन केले.’ पोलिसांनी तिच्यावर गुन्हा नोंद करून तिला अटक केली, तसेच या घटनेची चौकशी चालू केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *