Menu Close

कलम ३७० रहित केल्याच्या विरोधात लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयासमोर आंदोलन

अशी कितीही आंदोलने केली, तरी भारतावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही ! असे आंदोलन करणार्‍यांनी पाकमधील बलुचिस्तानच्या लोेकांच्या आंदोलनांचा प्रथम विचार करावा !

लंडन : जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रहित केल्याच्या विरोधात १५ ऑगस्टला येथील भारतीय उच्चायुक्तालयासमोर सहस्रो लोकांनी पाकिस्तान आणि काश्मीर यांचा झेंडा घेऊन घोषणाबाजी केली. या वेळी आंदोलकांनी ‘काश्मीर इज बर्निंग’ (काश्मीर जळत आहे), ‘फ्री काश्मीर’ (काश्मीर मुक्त करा) आणि ‘मोदी : मेक टी नॉट वॉर’ (मोदी : चहा बनवा, युद्ध नाही) अशा आशयाचे फलक घेऊन आंदोलन केले. ‘हे छोटेसे आंदोलन होते’, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *