Menu Close

राजस्थानमध्ये बजरंग दलाच्या तरुण कार्यकर्त्याची धर्मांधांकडून हत्या

काँग्रेसच्या राज्यांत धर्मांधांकडून नेहमीच हिंदूंच्या हत्या होतात आणि त्या विरोधात एकही पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, लेखक, अभिनेते, पत्रकार बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

कोटा (राजस्थान) : राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील गोरक्षक रिषिराज जिंदाल या २६ वर्षीय बजरंग दल कार्यकर्त्याची धर्मांधांनी नुकतीच गोळ्या घालून हत्या केली.

१. रिषिराज यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येथील एका उपाहारगृहात मेजवानी आयोजित केली होती. या वेळी ‘मोठ्या आवाजात संगीत लावले, फटाके फोडले आणि काश्मीरविषयी आनंदोत्सव साजरा केला’, असा आरोप करत इम्रान नावाच्या गुंडाच्या नेतृत्वाखाली स्थानिक धर्मांधांनी त्यांच्याशी वाद घातला. त्याच वेळी इम्रान याने बंदुकीतून जिंदाल यांच्या छातीवर गोळ्या झाडल्या.

२. जिंदाल यांना बेशुद्धावस्थेत रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती झालावाडचे पोलीस अधीक्षक राममूर्ती जोशी यांनी दिली.

३. या घटनेनंतर रिषिराज यांच्या चुलत बंधूंनी आरोपींच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. आरोपी इम्रान, त्याचा भाऊ खलिद, अन्वर आणि मंझला हे पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

४. इम्रान याची एका हत्येच्या प्रकरणी शिक्षा भोगून नुकतीच मुक्तता झाली होती. ‘इम्रान याचा गोतस्करीमध्ये सहभाग असतो, तर जिंदाल गोरक्षा समितीचे सदस्य होते’, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *