Menu Close

(म्हणे) ‘पंतप्रधान मोदी यांनी पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे !’ – आतंकवादी मसूद अझहर

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याचे प्रकरण

काश्मीरमधील जिहादी आतंकवादाचा नायनाट होण्याची वेळ आली आहे, हे आतंकवाद्यांना लक्षात आल्याने ते आता अशी विधाने करत आहेत !

नवी देहली : जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःचा पराजय मान्य केला आहे. त्यांनी स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे. काश्मीरविषयीचे त्यांचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. काश्मीरमधील जिहादचा एक अध्याय पूर्ण झाला आहे, अशी गरळओक आंतरराष्ट्रीय आतंकवादी आणि जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अझहर याने केली. ‘काश्मिरी मुसलमान त्यांचा अधिकार गमावणार आहेत आणि त्यांची भूमी उद्योगपती विकत घेतील’, असेही त्याने म्हटले आहे. ‘टेलिग्राम’ या ‘अ‍ॅप’वरून ‘फरान जेफरी’ या नावाने मसूदने ही गरळओक केल्याचे ‘एएन्आय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *