Menu Close

वणी (जिल्हा यवतमाळ) येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने मंदिर स्वच्छता आणि देवतांना साकडे

श्री जैताईमाता मंदिर येथे साकडे घालतांना साधकांसमवेत भाविक
श्री गजानन महाराज मंदिरात साकडे घालतांना साधकांसमवेत भाविक

वणी (जिल्हा यवतमाळ) : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवलेे यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ३ आणि ४ मे या दिवशी येथील ग्रामदैवत श्री जैताईमाता देवस्थान, श्री गजानन महाराज मंदिर आणि जैन लेआऊट मधील हनुमंताच्या २ मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. या चारही मंदिरांमध्ये परात्पर गुरु डॉ. जयंत आठवलेे यांना दिर्घायुरारोग्य लाभावे आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी साकडे घालण्यात आले. या वेळी सनातनचे साधक आणि भाविक उपस्थित होते. या उपक्रमाच्या वेळी उपस्थितांना या मंदिरांमधील चैतन्य वाढल्याचे जाणवले आणि साधकांची भावजागृती झाली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *