Menu Close

तैवानमध्ये घुसखोरी करणार्‍या चिनी लढाऊ विमानांना तैवानी लढाऊ विमानांनी हुसकावले

छोटासा तैवानही घुसखोर चीनला प्रत्युत्तर देतो; मात्र अण्वस्त्रदृष्ट्या सुसज्ज असतांनाही भारत मात्र चीनसमोर गुडघे टेकतो ! भारत छोट्याशा तैवानकडून बाणेदारपणा शिकेल, तो सुदिन !

ताईपई : चिनी लढाऊ विमानांनी तैवानी सीमारेषा पार करत घुसखोरी केली. त्या वेळी तैवानी लढाऊ विमानांनी त्यांना हुसकावून लावले. याची गंभीर नोंद घेत तैवानने, ‘चीनची ही कृती चिथवणारी आहे’, असे म्हटले आहे.

चीनची जे-११ या २ लढाऊ विमानांनी ३१ मार्चला सकाळी ११ वाजता तैवानच्या १८५ किलोमीटर आत घुसखोरी केली. त्या वेळी त्यांना पिटाळण्यासाठी तैवाननेही त्याची लढाऊ विमाने त्यांच्या मागावर पाठवत त्यांना हुसकावून लावले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *