Menu Close

गाईला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यासाठी ८ गोभक्तांनी विषप्राशन केले, एकाचा मृत्यू

सरकार आतातरी गार्इला ‘राष्ट्रमाता’ घोषित करून देशभरात गोहत्याबंदी कायदा लागू करेल काय ? – सम्पादक, हिन्दूजागृति

राजकोट – गाईला ‘राष्ट्रमाता’ हा दर्जा मिळावा या मागणीसाठी गुरुवारी आठ गोभक्तांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यातील एकाचा मृत्यू झाला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात गाईला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा, तसेच देशात गोमांसबंदी व्हावी या मागणीसाठी या गोभक्तांनी विषप्राशन केले.

त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, हिंदाभाई वांबाडिया यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य तिघांची प्रकृती गंभीर आहे.

स्त्रोत : महाराष्ट्र टाइम्स

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *