Menu Close

१७ फेब्रुवारी या दिवशी निपाणी येथे होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी पू. भगवान डोणे महाराज यांचे आशीर्वाद !

तुमच्या कार्याला यश मिळेल !

पू. भगवान डोणे महाराज (डावीकडे) यांच्याकडून सभेसाठी आशीर्वाद घेतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

निपाणी (जिल्हा बेळगाव) : रविवार, १७ फेब्रुवारी या दिवशी निपाणी येथील म्युनिसिपल हायस्कूलचे मैदान, पोलीस ठाण्यासमोर सायंकाळी ५.३० वाजता होत असलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने श्रीक्षेत्र आप्पाचीवाडीचे पू. भगवान डोणे महाराज यांचे आशीर्वाद घेण्यात आले. या वेळी पू. भगवान डोणे महाराज यांनी, ‘‘हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सभेच्या निमित्ताने प्रसारकार्य केल्याने सर्व ठिकाणी जागृती झालेलीच आहे. तुमच्या कार्याला यश मिळेल. नाथ तुमच्या पाठिशी आहेत’’, असा आशीर्वाद दिला. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अंजली कोटगी, श्री. आदित्य शास्त्री उपस्थित होते.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *