Menu Close

हिंदूंच्या सर्व समस्यांचे उत्तर हिंदु राष्ट्र स्थापनेत असून या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे ! – मनोज खाडये यांचे आवाहन

हिंदु जनजागृती समितीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंदु राष्ट्र संपर्क अभियान

मालवण येथे व्यावसायिक आणि धर्मप्रेमी यांना मार्गदर्शन करतांना डावीकडून श्री. मनोज खाडये आणि श्री. राजेंद्र पाटील
भेडशी येथे उपस्थितीत व्यावसायिक आणि धर्मप्रेमी यांना मार्गदर्शन करतांना १. श्री.मनोज खाडये
डावीकडून पहिले श्री. मंदार काणे यांच्याशी चर्चा करतांना श्री. नारकर आणि श्री. मनोज खाड्ये

सिंधुदुर्ग : हिंदु राष्ट्र संपर्क अभियानाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, तसेच गुजरात राज्याचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी नुकताच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. या दौर्‍यात श्री. खाडये यांनी देवगड, दोडामार्ग आणि मालवण तालुक्यांतील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, धर्मप्रेमी आणि उद्योजक यांची भेट घेऊन हिंदु राष्ट्राची स्थापना, मंदिरांचे सरकारीकरण, हिंदूंचे होणारे धर्मांतर, हिंदु जनजागृती समितीचे विविध उपक्रम, तसेच जीवनातील साधनेचे महत्त्व यांविषयी चर्चा केली, तसेच उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. या वेळी सनातन संस्थेसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर केली जाणारी टीका आणि आरोप यांविषयीची वस्तूस्थिती त्यांनी उपस्थितांसमोर मांडली. या सर्व समस्यांचे उत्तर हिंदु राष्ट्राची स्थापना हेच असून हिंदु राष्ट्राच्या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. खाडये यांनी या वेळी केले. या दौर्‍याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सर्वांनी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा दर्शवली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *