हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अपप्रकार थांबवून आदर्श नवरात्रोत्सव साजरा करण्याविषयी पोलिसांना निवेदन

नंदुरबार

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवून आदर्श उत्सव साजरा करण्याविषयी नंदुरबारचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी ‘नवरात्री उत्सवात होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल’, असे आश्‍वासन अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिले. या निवेदनात म्हटले आहे की,

१. ज्याप्रमाणे श्री दुर्गादेवीने अवतार घेऊन ९ दिवस युद्ध करून अत्याचारी महिषासुराचा वध केला, त्याप्रमाणे कलियुगात आतंकवाद, भ्रष्टाचार, व्यभिचार, धर्मांतर, लव्ह जिहाद आदी विविध रूपांतून कार्यरत असुरांचा नवरात्रोत्सवात नाश करण्याची आवश्यकता आहे.

२. हिंदु जनजागृती समिती मागील १६ वर्षांपासून उत्सवांतील अपप्रकार रोखून आदर्श पद्धतीने उत्सव साजरे करण्याविषयी प्रबोधन करत आहे.

३. उत्सवाच्या काळात सर्वच सार्वजनिक मंडळांनी कार्यक्रमस्थळी ओळखपत्र अनिवार्य करणे, कपाळाला टिळा-कुंकू लावूनच प्रवेश देणे, मुलींची छेड काढणार्‍यांना प्रतिरोध करणारे प्रशिक्षित युवक कार्यकर्ते सिद्ध ठेवणे, मुलींना कुटुंबातील सदस्य समवेत आणण्याची विनंती करणे यांसारख्या गोष्टींची काळजी घ्यावी.

यवतमाळ

सध्या सार्वजनिक नवरात्रोत्सवात अनेक अपप्रकार शिरले आहेत. चित्रपट गीतांच्या तालावर गरबा खेळणे, मद्यपान करणे, अश्‍लील अंगविक्षेप करत नाचणे, बळजोरीने वर्गणी गोळा करणे, मंडपात जुगार खेळणे, हिडीस नाच करून देवीची मिरवणूक काढणे आदी कारणांनी उत्सवाचे पावित्र्य नष्ट होत आहे. परिणामी या उत्सवाच्या काळात अनैतिक कृत्यांमध्ये वाढ होऊन, गर्भपाताच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे वृत्त अनेक दैनिकांत प्रसिद्ध झाली आहेत. त्यामुळे समाज राष्ट्र आणि धर्म यांची अपरिमित हानी झाली आहे. त्यामुळे या प्रकारावर आळा घालण्यासाठी दंडात्मक कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २ ऑक्टोबर २०१८ या दिवशी जिल्हा पोलीस उपअधीक्षक अनिल सिंह गौतम, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय आर्. राठोड, अवधूत वाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी.आर्. शुक्ला यांना देण्यात आले.

वरील अपप्रकारांना आळा घालू, असे आश्‍वासन पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आणि या संदर्भात समितीच्या कार्यकर्त्यांसमवेत सविस्तर चर्चा करण्यात आली.

निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री प्रशांत सोळंके, कैलास सुरसे, दत्तात्रय फोकमारे, विजय जाधव आणि सनातन संस्थेचे श्री. रवी देशपांडे इत्यादी उपस्थित होते.

Leave a Comment








Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​