Menu Close

उज्जैनच्या सिंहस्थ कुंभपर्वासाठी केंद्रशासनाचे एक रुपयाचेही साहाय्य नाही !

मुसलमानांवर हज यात्रेसाठी कोट्यवधी रुपये उधळणार्‍या शासनाजवळ हिंदूंच्या कुंभपर्वासाठी एक पैसाही नाही, हे लक्षात घ्या !

उज्जैन : सिंहस्थ कुंभपर्वासाठी राज्यशासन ३ सहस्र कोटी रुपये व्यय करत असतांना केंद्रशासनाकडून एक पैसाही मिळाला नसल्याचे सूत्र येथे सिंहस्थाच्या कार्याचे लोकार्पण करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासमोर उपस्थित झाले. या वेळी मुख्यमंत्री चौहान यांनी नवनिर्मित रेल्वे उड्डाणपूल, चारपदरी मार्ग, महाकाल मंदिर कोरिडोर इत्यादी कार्यांचे लोकार्पण केले. या वेळी पत्रकारांशी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, मध्यप्रदेशच्या पर्यटनामध्ये येणार्‍या काळात बेगा आणि उज्जैन प्रमुख केंद्र असेल. इंग्लंड, अमेरिका, सिंगापूर, दुबई आदी देशांमध्ये सिंहस्थाचीच चर्चा आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Read more on HJS in Kumbh Mela

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *