Menu Close

हरिणायामध्ये विवाह होण्यासाठी धर्मांतर करण्याचे ख्रिस्त्यांकडून हिंदूंना आमीष

धर्मशिक्षणाच्या अभावी वैयक्तिक स्वार्थासाठी धर्मत्याग करणारे नतद्रष्ट हिंदू ! कधी ‘विवाह होत नाही’ म्हणून मुसलमान किंवा ख्रिस्ती यांना धर्मांतर करतांना पाहिले आहे का ?

सोनीपत (हरियाणा) : येथील विकास जैन या तरुणाचा विवाह होत नव्हता. त्याला ख्रिस्ती मिशनरींनी ‘धर्मांतर केल्यास लग्न होईल’, असे आमीष दाखवून त्याचे धर्मांतर केल्याची घटना समोर आली आहे. विकास सोबतच अग्रवाल समाजातील अन्य ३ परिवारांनींही धर्मांतर केले आहे.

या घटनेमुळे अग्रवाल समाजाने एक बैठक घेऊन ११ जणांची एक समिती स्थापन केली आहे. ही समिती धर्मांतर करणार्‍यांना भेटणार आहे. आर्थिक कारणामुळे कोणी धर्मांतर केले असेल, तर त्यांना साहाय्य करण्यात येईल. जिल्हा व्यापार मंडळाचे अध्यक्ष संजय सिंगला यांनी म्हटले की, अजून काही परिवार धर्मांतर करण्याच्या सिद्धतेत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *