Menu Close

सैतानाला खूश करण्यासाठी ६४५ मुलांचा बळी दिला : घाना देशातील पाद्य्राचा दावा

ख्रिस्त्यांची क्रूरता !

आक्रा (घाना) : सैतानाला खूश करण्यासाठी पूजाविधीच्या वेळी ६४५ मुलांचा बळी दिल्याचा दावा आफ्रिका खंडातील घानामधील एका पाद्य्राने स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलतांना केला आहे. पाद्य्राचे नाव सध्या समोर आले नसले, तरी ‘जवळपास १७ वर्षे सैतानासह राहिलो आहे’, असे त्याने सांगितले. ‘सैतानासमवेतच माझा जन्म झाला’, असाही दावा त्याने केला आहे.

सैतानासमोर बळी देण्यासाठी एका वैद्यकीय संस्थेमध्ये काम करणार्‍या समूहाने मुले दिली होती. ‘सैतानाची पूजा करणार्‍या डॉक्टर आणि नर्स यांनी मुलांचे बळी दिले’, असा दावा पाद्य्राने केला आहे. या हत्या कधी आणि कोठे करण्यात आल्या ?, याविषयी पोलीस अधिक तपास करत आहेत. या हत्यांची स्वीकृती दिलेल्या पाद्य्राचे वय सध्या ३० वर्षांच्या आसपास आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *