Menu Close

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्री दुर्गादेवी देवस्थान, मुरुड येथे धर्मप्रेमींचे साकडे !

दापोली : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना दिर्घायुष्य लाभावे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी १४ मे २०१८ ला सायंकाळी ७.४५ वाजता श्री दुर्गादेवी देवस्थान, मुरुड येथे धर्मप्रेमींच्या वतीने साकडे घालण्यात आले.

हिंदु जनजागृती समितीचे श्री. परेश गुजराथी यांनी उपस्थित धर्मप्रेमींना साकडे घालण्याचे महत्त्व सांगितले. या वेळी देवस्थानचे पुजारी श्री. हर्षल भास्कर दातार, श्री. बळवंत जोशी, श्री. मनोहर जोशी, श्री. वामन वैशंपायन, श्री. सीताराम कदम, श्री. विक्रांत म्हसकर, श्री. विराज खोत, कु. नेहा दातार, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरज चव्हाण आणि श्री. अमित खेराडे उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *