Menu Close

होय, मी हिंदु आहे : उत्तरप्रदेशचे मंत्री मोहसीन रजा

शाहजहांपूर (उत्तरप्रदेश) : होय, मी हिंदु आहे; कारण मी हिंदुस्थानात रहातो, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशातील एकमेव मुसलमान धर्मीय मंत्री मोहसीन रजा यांनी येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर बोलतांना म्हटले. तसेच त्यांनी ‘भारतमाता की जय’ अशी घोषणाही दिली. काही दिवसांपूर्वी ते हनुमान जयंतीच्या वेळी लक्ष्मणपुरी येथील अलीगंजमधील हनुमान मंदिरात त्यांच्या मुलांसह दर्शनासाठी गेले होते. या वेळी त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी रामनाम लिहिलेली ओढणी अंगावर घेतली होती. तसेच कपाळावर टिळाही लावला होता. मंदिरात जाऊन त्यांनी हनुमानाची पूजा केली आणि प्रसाद वाटला होता.

मोहसीन रजा त्या वेळी म्हणाले होते की, या मंदिराची निर्मिती अवधचे नवाब वाजिद अली शाहची आई आलिया बेगम यांनी केली होती. हे हिंदु-मुसलमान यांच्या सलोख्याचे प्रतीक आहे. मी भारताचा नागरिक असल्याने माझी सर्व धर्मांवर आस्था आहे. जेथे धार्मिक सलोखा असतो तेथे मी नेहमीच जातो.

अलीगंजनंतर ते हनुमान सेतु स्थित हनुमान मंदिरातही गेले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Read more on Pro Hindu

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *