Menu Close

३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी नाशिक येथे निवेदन

पोलीस निरीक्षक श्री. रमेश यादव यांना निवेदन देतांना (डावीकडून) सर्वश्री शशिधर जोशी,प्रवीण सोनवणे, प्रसाद पवार

नाशिक : ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नाशिक येथे गंगापूर रोड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक श्री. रमेश यादव यांना निवेदन देण्यात आले. या वेळी समितीच्या वतीने श्री. शशिधर जोशी, धर्माभिमानी सर्वश्री प्रवीण सोनवणे, प्रसाद पवार आणि शैलेश कादवे उपस्थित होते.

या वेळी ३१ डिसेंबरच्या निमित्तानेहोणार्‍या अपप्रकारांविषयी समितीच्या वतीने राबवण्यात येणार्‍या प्रबोधनात्मक उपक्रमांविषयी श्री. यादव यांना अवगत करण्यात आले. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून समितीच्या वतीने २७ डिसेंबर या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या प्रबोधन फेरीविषयी त्यांना माहिती देण्यात आली.
या वेळी श्री. यादव यांनी निवेदने देण्यास अनेक जण येतात; परंतु तुम्ही नुसते निवेदन न देता चांगले रचनात्मक कार्य करत आहात. समितीचा उपक्रम स्तुत्यच आहे. अशा चांगल्या कार्यासाठी माझा तुम्हाला सदैव पाठिंबा राहील. तुम्हाला काही साहाय्य लागले, तर तुम्ही मला भेटू शकता, असे समितीच्या कार्यकर्त्यांना सांगितले.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *