Menu Close

विलासपूर (हरियाणा) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदुत्वनिष्ठांना मार्गदर्शन

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना (१) सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

विलासपूर (हरियाणा) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ककडोणी येथे हिंदु धर्माभिमान्यांसाठी नुकतेच एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती, जनतेची धर्माप्रती असलेली उदासीनता, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठ आणि जनता यांनी करावयाची कृती यांविषयी समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी समितीचे डॉ. भूपेश शर्मा, श्री. कार्तिक साळुंके आणि श्री. वसंत पाटील उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन पंडित रमण शास्त्री यांनी केले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *