Menu Close

हिंदु जनजागृती समितीने दिला हुतात्मा चंद्रशेखर आझाद यांच्या स्मृतीला उजाळा !

balidandin_news_hjs_nandurbar
हुतात्मा चंद्रशेखर आझाद यांच्याविषयी माहिती जाणून घेतांना जिज्ञासू

नंदुरबार : भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणारे वीर क्रांतिकारक हुतात्मा चंद्रशेखर आझाद यांच्या ८५ व्या बलीदानदिनी हिंदु जनजागृती समितीने येथे प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या महान कार्याच्या स्मृतीला उजाळा दिला.

नंदुरबार येथील मोठा मारुति मंदिर सभागृहात हा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रतिमा पूजन भाजपचे शहर अध्यक्ष श्री. मोहन खानवाणी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास सर्वश्री मोहन जैन, सुभाष खानवाणी, मंदिराचे पुजारी श्री. विलास जोशी, मंदिराचे विश्‍वस्त आदींची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी चंद्रशेखर आझाद यांच्या कार्याची माहिती डॉ. नरेंद्र पाटील यांनी सांगितली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *