Menu Close

केरळमधील दिग्दर्शक सेक्सी दुर्गा नावाचा चित्रपट काढणार !

अन्य धर्मियांच्या देवतांची नावे अशा प्रकारे वापरण्यास सनलकुमार शशिधरन् धजावतील का ?

Durga_denigrationतिरुवनंथपुरम् : केरळ राज्यातील पारितोषिक विजेते दिग्दर्शक सनलकुमार शशिधरन् यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव सेक्सी दुर्गा असे ठेवण्याचे जाहीर केले आहे. लैंगिकता, खाजगी जीवन आणि महिला यांकडे केरळाचा समाज कशा पद्धतीने पहातो यासंदर्भात या चित्रपटात उहापोह करण्यात आला आहे. सेक्सी दुर्गा या नावामुळे या चित्रपटावर आक्षेप घेण्यात येईल, असे सनलकुमार यांना विचारले असता, कलाकारांच्या कलास्वातंत्र्यावर कोणी गदा आणता कामा नये. चित्रपटाचे नाव पालटणे म्हणजे शरण जाण्यासारखे आहे आणि ते मी मान्य करणार नाही, असे मत हिंदुद्वेषी सनलकुमार यांनी व्यक्त केले. (या कलाकारांना त्यांचे स्वातंत्र्य केवळ हिंदूंच्या देवतांचे विडंबन करतांनाच आठवते का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या चित्रपटात राजश्री देशपांडे या प्रमुख भूमिका करणार आहेत, तर इतर कलाकारांत प्रदीप कुमार, अरुण नायर इत्यादींचा समावेश आहे. (हिंदूंच हिंदु धर्माचा अवमान करतात, असे कुणी म्हटल्यास त्यात गैर ते काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *