Menu Close

राजमाता जिजाऊ सोहळ्यात बिभत्स नाच-गाण्याचे प्रदर्शन

राष्ट्र-माता जिजाऊ ह्यांच्या सोहळ्यात अशा बिभत्स नाच गाण्यांचे प्रदर्शन करणे हा त्यांचा अपमानच आहे ! – संपादक, हिंदुजागृती

जळगाव : शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्थेतर्फे रविवारी देण्यात येणारा राज्यस्तरीय राष्ट्रमाता जिजाऊ जीवनगौरव व शिवपुत्र शंभुराजे गौरव पुरस्कार वितरण सोहळा अश्लील नृत्याने वादात सापडला आहे. या सोहळ्यात अभिनेत्री वृक्षाली हटाळकर हिने बिभत्स गाण्यावर रविवारी नृत्य सादर केल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. ज्यांच्या नावाने पुरस्कार दिले जात आहेत, त्यांच्या आदर्शालाच धक्का पोहोचविणारा हा प्रकार असल्याची टीका होत आहे.

या कार्यक्रमात राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी गर्दी केली होती. आमदार, विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह महिला व लहान मुलांचीही या वेळी उपस्थिती होती. सांस्कृतिक कार्यक्रमाला ‘देवा श्रीगणेशा’ने सुरुवात झाली; समारोप मात्र ‘चिकनी चमेली’ने झाल्यामुळे या कार्यक्रमात अनेक नागरिकांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *