Menu Close

‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु-मुसलमान ऐक्य (?) दर्शवू पहाणार्‍या ‘जीवा’ या मराठी चित्रपटाच्या मुहुर्ताचा शुभारंभ

मुंबई : ओमकार प्रोडक्शन निर्मित ‘जीवा’ या मराठी चित्रपटाच्या मुहुर्ताचा शुभारंभ ११ डिसेंबरला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम पु.ल. देशपांडे कला अकादमी, तिसरा मजला, मिनी थिएटर, रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जीवा चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शक प्रदीप पायळ यांनी दिली आहे. प्रदीप पायाळ हे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते असून उद्योजक आहेत. ‘हिंदू-मुसलमान ऐक्यासाठी, तसेच सहिष्णुता, बंधुभाव वाढीस लागावा, यासाठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून ‘लव्ह जिहाद’ हा विषय चित्रपटात हाताळण्यात येणार आहे’, अशी माहिती त्यांनी दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Read more on Love Jihad

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *