केंद्रातील भाजप सरकारने हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी धर्मांतरविरोधी कायदा केल्यास आणि हिंदूंना धर्मशिक्षण देऊन धर्माचरणी बनवल्यास कुणी धर्मांतर करण्याचे धाडस करणार नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

सुरीर (मथुरा) : येथे हिंदूंचे आमीष दाखवून धर्मांतर करण्यासाठी आलेल्या ७ ख्रिस्ती मिशनरींना हिंदुत्वनिष्ठांच्या साहाय्याने अटक करण्यात आली आहे. येथील इरौली गुर्जर गावामधील वाल्मीकि समाजातील लोकांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. येथील प्रदीप वाल्मीकि यांच्या घरी ते प्रार्थनेसाठी आले होते. यात २ महिलाही होत्या. यातील एका महिलेसमवेत तिचा लहान मुलगा असल्याने गावकर्यांनी सांगितल्यानंतर तिला सोडून देण्यात आले. अटक करणार्यांमध्ये उत्तरप्रदेश, देहली, ओडिशा आणि तमिळनाडूच्या कोइम्बतूर येथील काही जण आहेत. (हिंदूंच्या धर्मांतरासाठी ख्रिस्ती मिशनरी देशभरातून संघटित होऊन प्रयत्न करतात, हे हिदूंंनी लक्षात घेऊन हिंदु धर्माच्या रक्षणासाठी संघटित व्हावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात


