Menu Close

(म्हणे) ‘लव्ह जिहाद’सारखी कोणतीही गोष्ट नाही !’ – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव अब्दुल वाहिद सेठ

• भारताला इस्लामी देश करण्याचा हेतू ठेवणारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया कधीतरी लव्ह जिहादचा विरोध करील का ?

• केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव अब्दुल वाहिद सेठ एकाच प्रकारचे विधान करतात हे लक्षात घ्या !

कोलकाता – जर एखादी मुलगी स्वतःच्या इच्छेने कोणाशी विवाह करत असेल, तर त्याला लव्ह जिहाद कसे म्हणू शकतो ?, असा प्रश्‍न पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव अब्दुल वाहिद सेठ यांनी येथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये केला.

अब्दुल वाहिद पुढे म्हणाले की,

आमच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. यापैकी लव्ह जिहाद हा एक आहे. तो अत्यंत चुकीचा आहे. आमची संस्था मुलांना भरती करून त्यांना लव्ह जिहादचे प्रशिक्षण देते, असा आरोप केला जात आहे. हा एकदम खोटा आरोप आहे. केरळमधील अथिया प्रकरणाला सर्व जण ‘लव्ह जिहाद’ म्हणत आहेत. हे चुकीचे आहे; कारण ती सज्ञान आहे. तिला तिच्या जीवनामधील निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *