Menu Close

अवैध पशूवधगृहे बंद न केल्यास धाडी टाकू – हिंदु राष्ट्र सेना

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा करणार्‍या सरकारचे अवैध पशूवधगृहांकडे दुर्लक्ष का ?

सारसनगर (जि. नगर) – शहरातील अवैध पशूवधगृहे तात्काळ बंद करावीत. महापालिका प्रशासनाला ही कारवाई करता येत नसेल, तर हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने धाडसत्र चालू केले जाईल, अशी चेतावणी हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने देण्यात आली आहे. येथील कानडेमळ्यातील नाल्यात नुकतेच दहा ते बारा बंद गोण्यांमध्ये मांस, तसेच वासराचे मुंडके आणि धड आढळून आले होते. नाल्यामध्ये रक्तमिश्रित पाणी वहात होते. या पार्श्‍वभूमीवर हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने प्रसिद्धीपत्रक काढून अवैध पशूवधगृहांकडे पालिका-प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. – संदर्भ : दै. नगर टाईम्स

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *