Menu Close

हिंदु राष्ट्राची स्थापना या सनातन प्रभातच्या ध्येयासाठी सनातन प्रभातचे वाचकही कटिबद्ध आहेत ! – अजय संभूस

डोंबिवली (ठाणे) येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘सनातन प्रभात’चा वाचक मेळावा

डोंबिवली (जिल्हा ठाणे) : सनातन प्रभात हे नियतकालिक गेल्या २० वर्षांपासून विविध भाषांतून चालू आहे. अन्य वृत्तपत्रात सर्वाधिक खपासाठी चढाओढ असते; पण सनातन प्रभातचे ध्येय हिंदु राष्ट्राची स्थापना हे आहे. यासाठी सनातन प्रभातचे वाचकही कटिबद्ध आहेत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. अजय संभूस यांनी येथे झालेल्या वाचक मेळाव्यात केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. वेदिका पालन उपस्थित होत्या. सौ. पालन यांनीही या वेळी नामजप, साधना यांची आवश्यकता विशद केली.

‘दैनिक वाचल्याविना चैन पडत नाही. दोन ओळी वाचल्या, तरी त्यातून ऊर्जा मिळते’, अशी प्रतिक्रिया एका वाचकांनी व्यक्त केली.

सहकार्य

१. शिवानंद डेअरी यांनी अल्पाहारासाठी विनामूल्य दूध उपलब्ध करून दिले.

२. श्री. तुकाराम केणी यांनी वाचकांना बसण्यासाठी विनामूल्य खुर्च्या उपलब्ध करून दिल्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *