Menu Close

रोहिंग्यांना हाकला, देश वाचवा ! – हिंदुत्वनिष्ठांनी केली आंदोलनातून मागणी

चोपडा : म्यानमार येथून विस्थापित झालेले रोहिंग्या मुसलमान जम्मूपासून देहली, बंगाल, बिहार, तेलंगणा आदी अनेक राज्यांत घुसखोरी करून रहात आहेत. नुकतेच बांगलादेशातील रोहिंग्या हिंदूंवर अत्याचार करून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याच्या, तसेच नमाज करण्यास भाग पाडल्याच्या घटना उघडकीस आल्या. त्यामुळे देशभरात सामान्य नागरिकांमध्ये रोहिंग्यांविषयी संताप असून त्यांना देशात थारा देण्यात येऊ नये, अशीच भूमिका सामान्य जनांचीही आहे. रोहिंग्या मुसलमानांना भारतातून हाकलून लावावे आणि म्यानमारमधील हिंदूंना भारत शासनाने न्याय द्यावा, या मागणीसाठी, तसेच सिंहगडावरील बांधकामात भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शासन करावे, या मागणीसाठी चोपडा येथील तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *