Menu Close

चिनी फटाके, तसेच हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके विकणार्‍यांवर कारवाई करा !

हिंदु जनजागृती समितीकडून पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन

पुणे : दिवाळीच्या काळात चिनी फटाके, तसेच हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असणारे फटाके विकणार्‍या विक्रेत्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस-प्रशासन विभागातील अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक भट, दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भगवान गुरव, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू जगताप, महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी आशिष महाडदडकर यांना निवेदन देण्यात आले. अनिल पाटील आणि विष्णू जगताप यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यासंदर्भात परिपत्रक काढण्याचे आश्‍वासन दिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *