Menu Close

हिंदुद्वेष्ट्याकडून स्वामी समर्थांवर अत्यंत अश्‍लील टीका करणारी फेसबूक पोस्ट : धर्मसभेकडून निषेध

  • हिंदूंच्या संतांवर एवढ्या खालच्या पातळीवर टीका करण्यास हिंदूद्वेष्टे धजावतात ही गोष्ट हिंदु संघटनाची आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता प्रतिपादीत करते.
  • मुसलमान राष्ट्रांमध्ये ईशनिंदेसाठी देहांत शिक्षा असते, तीच शिक्षा या हिंदुद्वेष्ट्यांना केल्याशिवाय हिंदु संत आणि देवता यांच्यावरील टीकांना पायबंद बसणार नाही. – संपादक, दैनिक सनातन प्रभात 

मुंबई : भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाद्वारे सर्वसामान्य भाविकांना आशीर्वाद देणारे स्वामी समर्थांवर माणिक कुरणे या हिंदुद्वेष्ट्याने अतिशय अश्‍लील भाषेत टीका करून त्यांचा अवमान करणारी फेसबूक पोस्ट केली आहे. केवळ लंगोट घातलेली, नग्न माणूस या शिवाय अश्‍लील टीका केली असून त्यामुळे हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या लिखाणाविषयी सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे हिंदू निषेध नोंदवत आहेत. धर्मसभेने या लिखाणाचा निषेध केला आहे, अशी माहिती धर्मसभेचे अध्यक्ष वेदमूर्ती धनंजय वैद्य यांनी दिली आहे. हे लिखाण मागे न घेतल्यास भक्त मंडळींनी पोलिसांत तक्रार करून कायदेशीर कारवाई करण्याचे ठरवल्यास त्यांना सहकार्य करण्याची सिद्धता धर्मसभेने दाखवली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *