Menu Close

संभाजीनगर येथे १५ ऑगस्टच्या निमित्ताने सामूहिक ‘वन्दे मातरम्’ अन् क्रांतीकारकांचे प्रदर्शन यांचे आयोजन

संभाजीनगर : येथील त्रिमूर्ती चौक आणि गजानन महाराज मंदिर चौक येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिक ‘वन्दे मातरम्’चे गायन करण्यात आले, तसेच रेल्वे स्टेशन आणि हडको भागात क्रांतीकारकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या दोन्ही उपक्रमांना समाजातील जिज्ञासूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि कार्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा दर्शवली.

वैशिष्ट्यपूर्ण

१. पारस एजन्सीचे श्री. साजन जैन यांनी उपक्रमाच्या ठिकाणी स्वच्छतेची सेवा केली. ते म्हणाले की, प्रत्येक देशभक्ताने अशा उपक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे. यापुढेही मी अशा उपक्रमात सहभागी होईन.

२. साई क्लेक्शनचे श्री. सचिन गोकुळपुरे यांनी स्वतःहून वरील उपक्रमाचा विविध सामाजिक संकेतस्थळाद्वारे प्रसार केला. याचसमवेत ते स्वतः एका गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष असून ‘आदर्श गणेशोत्सव’ करण्यासाठी प्रयत्न करतो’, असेही म्हणाले.

३. क्रांतीकारकांचे प्रदर्शन पाहून श्री. देवजी पटेल आणि त्यांच्या स्नुषा सौ. जयश्री पटेल म्हणाल्या की, सद्यस्थितीत समाजाला अशा प्रदर्शनाची आवश्यकता आहे. यातून प्रेरणा मिळाली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *