Menu Close

कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींवर बंदी न घातल्यास न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका प्रविष्ट करणार !

धर्माभिमानी श्री. विजय गावडे यांची पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना कायदेशीर नोटीस

पुणे : ‘राष्ट्रीय हरित लवादा’च्या न्यायालयात कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देणारा शासकीय निर्णय चुकीचा असल्याचे सिद्ध होऊन न्यायालयाने शासनाच्या आदेशावर ३० सप्टेंबर २०१६ या दिवशी स्थगिती आणली. त्यामुळे शासनाने कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींवर बंदी न घातल्यास न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका प्रविष्ट करण्याच्या संदर्भात येथील धर्माभिमानी श्री. विजय गावडे यांनी अधिवक्ता नीलेश निढाळकर यांच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *