Menu Close

येमेनमध्ये ३ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या करणार्‍याला शिक्षा म्हणून गोळ्या घालून ठार केले !

सना (येमेन) : येमेनमध्ये ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्‍या महंमद मगराबी (वय ४१ वर्षे) याला शरीयत न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी एके ४७ रायफलमधून गोळ्यांचा वर्षाव करत ठार करण्यात आले. या वेळी मृत मुलीचे वडील उपस्थित होते. ते म्हणाले की, या शिक्षेनंतर मला शांतता लाभली आहे.

मगराबी याने ईदच्या दिवशीच या मुलीचे अपहरण केले होते. तिला ठार केल्यावर एका मशिदीबाहेर तीचे शव फेकून दिले होते. न्यायालयाने प्रथम त्याला १०० कोडे मारण्याची शिक्षा दिली होती; मात्र जनतेचा संताप पाहिल्यावर त्याला मृत्यूदंड दिला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *