Menu Close

बेल्जियममधील मद्य उत्पादक आस्थापनाकडून बिअरचे नाव ब्रह्मा ठेवून देवतेचे विडंबन

नेवाडा (अमेरिका ) : ल्यूव्हन (बेल्जियम) येथील अग्रगण्य जागतिक मद्य उत्पादक अनहेझर-बुश इनब्रेव या आस्थापनाने त्याच्या बिअर या उत्पादनाचे नाव ब्रह्मा असे ठेवून हिंदु देवतेचे विडंबन केले आहे. हे लक्षात आल्यावर हिंदूंनी त्याचा निषेध व्यक्त केला आहे. हॉलीवूडमधील अभिनेते मेगन फॉक्स आणि जेनिफर लोपेझ यांनी ब्रह्मा बिअरच्या विज्ञापनामध्ये अभिनय केला आहे.

नेवाडा येथून निवेदन प्रसारित करून हिंदु धार्मिक नेते श्री. राजन झेद म्हणाले की, मादक असलेल्या पेयाचा ब्रह्माशी संबंध साधल्याने देवतेचे विडंबन होते, व्यावसायिक किंवा अन्य विषयांसाठी हिंदु देवता किंवा संकल्पना किंवा प्रतीकांचा अयोग्य वापर होत असल्याने भक्त दुखावले जातात.

धर्माभिमानी हिंदू पुढील इमेल पत्त्यावर निषेध नोंदवत आहेत.

इमेल : [email protected]

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *