Menu Close

नागपुरात मारहाण झालेल्या सलीमकडे गोमांसच होते !

नागपुरात जमावाकडून मारहाण झालेल्या सलीमकडे गोमांसच असल्याचे स्पष्ट झाले आहे. एफएसएलच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी सलीम इस्माईल शाह याला बेदम मारहाण करण्यात आली होती. सलीम इस्माईल हा मांस विक्रेता आहे. तो त्याच्याकडे असलेल्या दुचाकीच्या डिक्कीमधून मांस घेऊन चालला होता. त्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली होती. मात्र सलीमच्या गाडीच्या डिक्कीत असलेले मांस गोमांस असल्याचे आता समोर आले आहे.

बुधवारी इस्माईलला झालेल्या मारहाणीनंतर माझ्याकडे गोमांस नव्हतेच असा कांगावा सलीमने केला होता. त्यानंतर या मांसाचे नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले होते, फॉरेन्सिक अहवालात दिलेल्या माहितीनुसार सलीमकडे गोमांसच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बुधवारी सलीमला मारहाण केल्याप्रकरणी अश्विन उईके, रामेश्वर तायवाडे, मोरेश्वर तांदूळकर आणि जगदीश चौधरी या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. सलीम शाह बुधवारी नागपुरात आला होता, त्यावेळी त्याच्याकडे गोमांस असल्याचा संशय या चौघांना आला होता आणि त्यांनी सलीमला मारहाण केली होती.

स्त्रोत : लोकसत्ता

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *