Menu Close

या देशाला हिंदु राष्ट्र बनवण्याचा घातक प्रयत्न चालू आहे – शरद पवार

  • राष्ट्रवादी काँग्रेसकडून इतिहासतज्ञांची बैठक

मुंबई : या देशाला हिंदु राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. तो देशाला घातक आहे. हा देश निधर्मी आहे. यासाठी देशविघातक शक्तीविरुद्ध एकत्र आले पाहिजे, असे हिंदुद्वेषी वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. मुंबई येथे इतिहासतज्ञांची एक बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बोलवण्यात आली होती. त्या वेळी त्यांनी वरील वक्तव्य केले.

पवार पुढे म्हणाले, काही वर्गाकडून इतिहास बदलण्याचा प्रयत्न चालू आहे. (इतिहास पालटण्याचा नव्हे, तर हिंदुत्ववादी विकृत आणि हिंदुद्वेषी इतिहास सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) यातून काही घटकांविषयी द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे (हिंदूंचा सत्य इतिहास सांगणे म्हणजे द्वेष पसरवणे कसे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात); म्हणून या विषयावर इतिहासतज्ञ प्राध्यापकांशी चर्चा केली पाहिजे. सातत्याने भेटले पाहिजे. इतिहासाला वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याविरोधात लिखाण केले पाहिजे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *