Menu Close

गणरायाबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या रामगोपाल वर्माविरुद्ध समन्स

मुंबई : हिंदूंचे दैवत असलेल्या गणपतीबद्दल आक्षेपार्ह ट्विट करून सर्वसामान्य नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल चित्रपट निर्माते रामगोपाल वर्मा यांच्याविरुद्ध अंधेरी येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने आज न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले. वर्मा यांनी येत्या ८ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष हजर राहून भूमिका स्पष्ट करावी असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

२०१४ मध्ये रामगोपाल वर्मा यांनी गणपतीबद्दल आक्षेपार्ह ट्विट केले होते.

इंडस् कम्युनिकेशनचे व्यवस्थापकीय संचालक विवेक शेट्टी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून हे समन्स बजावण्यात आले आहे. समन्स बजावण्यात आल्यामुळे शेट्टी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

संदर्भ : सामना

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *