Menu Close

बेलापूर (जिल्हा नगर) येथे धर्मांधांच्या मारहाणीत एका हिंदूचा मृत्यू, तर एक गंभीर घायाळ

हिंदूंना अमानुष मारहाण करणार्‍या धर्मांधांच्या कारवाया कायमच्या बंद होण्यासाठी आता हिंदु राष्ट्राशिवाय पर्याय नाही ! धर्मनिरपेक्ष हिंदू आणि अल्पसंख्यांकधार्जिणे राजकारणी यांनी अल्पसंख्यांकांचे नको एवढे लाड केल्यामुळेच अल्पसंख्यांक एखाद्या कुटुंबातील बिघडलेल्या मुलाप्रमाणे उद्दाम झाले आहेत.       

श्रीरामपूर : तालुक्यातील बेलापूर येथे २८ जानेवारी या दिवशी रात्री ८ वाजता ११ धर्मांध आणि १ अल्पसंख्यांक यांनी दोन हिंदूंना मागील एका किरकोळ वादावरून गंभीर मारहाण केली. (काही ना काही निमित्त शोधून हिंदूंना मारहाण करणार्‍या धर्मांधांना किती काळ सहन करायचे, असे हिंदूंना वाटल्यास नवल ते काय ? – संपादक) धर्मांधांनी बेलापूर येथील रामेश्‍वर राजेंद्र महाले आणि राकेश नागले यांना मारहाण करण्यासाठी लोखंडी रॉड आणि लाकडी दांडके यांचा वापर केला होता. या मारहाणीमुळे रामेश्‍वर महाले याचा उपचाराच्या कालावधीत मृत्यू झाला असून राकेश नागले यांच्यावर उपचार चालू आहेत.पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट करून ८ जणांना अटक केली आहे.

या गुन्ह्यातील अन्य ४ जण फरार आहेत. बेलापूर ग्रामस्थांनी २९ जानेवारी या दिवशी गाव बंद ठेवून या मारहाणीचा निषेध केला. मारहाणीमध्ये हत्या होण्याची श्रीरामपुरमधील ही चौथी घटना आहे.

राकेश नागले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अक्रम अकिल शेख, असिफ शेख, नयूम बागवान, नोईद बागवान, सूरज मायकल नन्नवरे, सलमान बागवान, तौसिफ शेख, शाहीद मलिक, युनूस शेख यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे. या घटनेमुळे गावातील तणाव वाढू नये; म्हणून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *