Menu Close

खांडवा (मध्यप्रदेश) येथे ५० हून अधिक हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ३ ख्रिस्त्यांना अटक

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्त्यांना जोपर्यंत कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत त्यांना धाक बसणार नाही !

खांडवा (मध्यप्रदेश) : पोलिसांनी येथून अमर सिंह, किशोर बरेला आणि प्रभाकर बिरला या ३ ख्रिस्त्यांना हिंदूंचे बळजोरीने धर्मांतर करत असल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. (बाटलेल्या हिंदूंचे नाव न पालटता मूळ हिंदु नावे तशीच ठेवून लोकांच्या डोळ्यांत धूळफेक करण्याचाच ख्रिस्ती मिशनर्‍यांचा प्रयत्न असतो, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) राजू नावाच्या एका गावकर्‍याने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. या तिघांनी सीताबेरी गावात शिबिराचे आयोजन केले होते. येथे ते आदिवासींना बायबल आणि क्रॉस वाटत होते. ‘जर तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवाल, तर तुमचे आजार दूर होतील’, असे या तिघांनी म्हटले होते. (जगातील बहुतेक ख्रिस्ती राष्ट्रांतील ख्रिस्ती येशूवर विश्‍वस ठेवत नाहीत, असा याचा अर्थ होतो; कारण या राष्ट्रांतून विविध आजारांमुळे प्रतिदिन सहस्रवधी ख्रिस्त्यांचा मृत्यू होत असतो ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या तिघांवर गावातील ५० हून अधिक लोकांचे धर्मांतर केल्याचा आरोपही आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *