Menu Close

अमरावती येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

 

amravati_nivedn
निवेदन स्वीकारतांना अमरावतीचे जिल्हाधिकारी श्री. गीते

अमरावती : राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी समिती स्थापन करण्याविषयी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी अमरावतीमध्येसुद्धा व्हावी. प्लास्टिकचे ध्वज वापरू नयेत, तसेच कुठल्याही प्रकाराने राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये याकडे जिल्ह्यामध्ये शासकीय स्तरावर उपक्रम राबवून राष्ट्रध्वजाचा अवमान रोखावा, अशी विनंती या वेळी जिल्हाधिकारी श्री. किरण गीत्ते यांना करण्यात आली.

त्याचप्रमाणे मालदा (पश्‍चिम बंगाल) येथे झालेल्या दंगलीमध्ये सहभागी धर्मांधांवर त्वरित कारवाई करून हिंदूंना न्याय मिळावा, अशीही मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिलिंद साखरे, कु. मुक्ता खापरे, कु. श्रृतीका वानखडे, तसेच सनातन संस्थेच्या सौ. सावरकर, श्री. संजय चौधरी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *