Menu Close

इंदूर येथे बैठकांच्या माध्यमातून हिंदूंमध्ये जागृती !

इंदूर : येथील मानवतानगर येथे आयोजित एका बैठकीत हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. योगेश व्हनमारे यांनी उपस्थितांना अध्यात्म, साधना, काळानुसार आवश्यक साधना या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी अनेकांनी त्यांच्या मनातील प्रश्‍न विचारून शंकासमाधान करून घेतले. हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाचे वाचक श्री. आशिष साध यांनी पुढाकार घेऊन या बैठकीचे आयोजन केले होते.

या बैठकीत आलेले श्री. हेमंत बागोरा यांनी पुढाकार घेऊन कैलाशपुरी स्थित श्री राम जिम्नेशियम येथे संघाच्या शाखेत एका बैठकीचे आयोजन केले. या वेळी श्री. व्हनमारे यांनी उपस्थितांना शौर्य जागरण या विषयावर संबोधित केले. दोन्ही बैठकीचा ६० हून अधिक युवकांनी लाभ घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *