Menu Close

स्टीव वॉ ने गंगेच्या पात्रात विसर्जित केल्या अापल्या मित्राच्या अस्थी !

ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव वॉने आपल्या मित्राची अखेरची इच्छा पूर्ण करत त्याच्या अस्थी गंगेत विसर्जित केल्या. स्टीव वॉ मंगळवारी वाराणसीत आले होते. हिंदू संस्कृतीनुसार आपल्या अस्थी गंगेच्या पात्रात विसर्जित व्हाव्यात अशी स्टीव वॉचे मित्र स्टीफन यांची अखेरची इच्छा होती. ४ महिन्यांपूर्वी स्टीफन यांचे निधन झाले होते. स्टीफनची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्टीव वॉ आपल्या जॉन्सन या आणखी एका मित्रासह वाराणसीत आले होते. वाराणसीत एका गाईडची मदत घेत दोघे दश्वमेध घाटावर पोहोचले. तेथून एका बोटीने ते मनकर्णिका घाटावर पोहोचले आणि हिंदू संस्कृतीनुसार अस्थिविसर्जन केले.

माध्यमांशी बोलताना स्टीव वॉ म्हणाले की, स्टीफन हा माझा खूप जवळचा मित्र होता. आपल्या मृत्यूनंतर अस्थी गंगाघाटावर विसर्जित व्हाव्यात अशी शेवटची इच्छा स्टीफनने व्यक्त केली होती. त्याची इच्छा आज मी पूर्ण केल्याने मला खूप समाधान वाटत आहे. वाराणसीसारखे सुंदर ठिकाण मला पाहता आले. वाराणसीला भेट देण्याची कित्येक वर्षापासूनची इच्छा होती. येथील आध्यात्मिक भावना पाहून मी थक्क झालो.

संदर्भ : लोकसत्ता

Read more on Hinduism

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *