Menu Close

बारामती येथे ३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार रोखण्याविषयी तहसीलदारांना निवेदन

बारामती (जि. पुणे) : ३१ डिसेंबर या दिवशी राज्यातील किल्ले, तीर्थक्षेत्रे, प्रेक्षणीय स्थळे आणि सार्वजनिक स्थळे येथे नववर्षाच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवण्याविषयीचे निवेदन येथील नायब तहसीलदार श्री. मधुकर ठोंबरे यांना देण्यात आले. या वेळी अपप्रकार करणार्‍यांवर कारवाई करू, असे आश्‍वासन नायब तहसीलदारांनी दिले. निवेदन देते वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. संगीता बुरुडे, सौ. रूपाली चव्हाण, सौ. सुधा घाटगे, सौ. श्रद्धा कापशीकर उपस्थित होत्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *