Menu Close

हुबळी (कर्नाटक) येथे श्रीराम सेनेच्या दुर्गा दौड कार्यक्रमात रणरागिणी शाखेचा सहभाग

ranragini

हुबळी (कर्नाटक) : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने श्रीराम सेनेकडून येथे आयोजित करण्यात आलेल्या दुर्गा दौड कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी या महिला शाखेने भाग घेतला. हुबळी-धारवाडच्या उपमहापौर सौ. लक्ष्मी उप्पार यांनी येथील मूरुसविरा मठामध्ये या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

या कार्यक्रमाला श्रीराम सेनेचे बेळगाव जिल्हा संघटक श्री. रमाकांत कोंडोस्कर, रणरागिणी शाखेच्या कु. स्फुर्ति बेनेकवारी, श्री. मोहन गुरुस्वामी उपस्थित होते. श्रीराम सेनेचे श्री. राघवेंद्र कटरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले आणि ओळख करून दिली. या वेळी कु. स्फुर्ति बेनेकवारी यांनी लव्ह जिहादच्या माध्यमातून होणारे धर्मांतर आणि प्रतिदिन वाढणारे महिलांवरील अत्याचार यांविषयी विचार मांडले. याबरोबरच त्यांनी नवरात्री उत्सव, दुर्गादेवीचा जप आणि धर्माचरण यांचे महत्त्व विषद केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *