Menu Close

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून कृत्रिम हौदाच्या नावाखाली दिशाभूल करत श्री गणेशमूर्तींची विटंबना !

ganesh_visarjan_apman

हे छायाचित्र कुणाच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी नाही, तर केवळ वस्तूस्थिती कळावी, यासाठी प्रसिद्ध करत आहोत.

नवी सांगवी (पुणे) : येथील पवना घाटावर कृत्रिम हौदातील गणेशमूर्तींची अशा प्रकारे विटंबना झाल्याचे चित्र पहायला मिळाले. (या संदर्भात महापालिका आयुक्तांनी खुलासा करणे अपेक्षित आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) नदीपात्रामध्ये पाण्याअभावी अनेक भाविकांना पालिकेने सिद्ध केलेल्या कृत्रिम हौदांमध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करावे लागले. हौदात विसर्जन झालेल्या गणेशमूर्ती पालिकेचे कर्मचारी तेथेच आणि परिसरात सोडून गेल्याचे निदर्शनास आले. यामुळे श्री गणेशमूर्तींची घोर विटंबना झाली असून सहस्रो हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *