Menu Close

पाकमध्ये पोलिसाने एका हिंदु युवतीला ५० सहस्र रुपयांत विकले !

पाकमध्ये हिंदूंचे नरकमय जीवन ! भारत सरकारने पाकमधील हिंदूंची या नरकमय जीवनातून सुटका करावी, अशी अपेक्षा आहे !

कराची : सिंध प्रांतातील मीरपूर शहरामध्ये सज्जाद काझी या पोलीस कर्मचार्‍याने एका हिंदु युवतीला ५० सहस्र रुपयांना विकले. त्यानंतर तिचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले. काझी याला निलंबित करण्यात आले असून पुढील तपास चालू आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार माथेलो पोलीस ठाण्याचे मुख्य लिपीक सज्जाद काझी याने हिंदु युवती अनिला बागरी हिची विक्री केली. स्थानिक हिंदु युवकाने सांगितले की, पाकिस्तानमध्ये हिंदु युवतींचे अपहरण, बलात्कार आणि त्यांचे बलपूर्वक धर्मांतरण करून विवाह करणे ह्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. पाकिस्तानमधून हिंदूंना बाहेर काढून केवळ मुसलमानांचा देश रहावा, अशी येथील नागरिकांची इच्छा आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *