Menu Close

श्री ज्ञानदेव सेवा मंडळ, ठाणे यांच्या वतीने सनातन संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक यांचा सत्कार !

THN_SUN_O_1_1
श्री. अभय वर्तक (मध्यभागी) यांचा सत्कार करतांना डावीकडून ह.भ.प. एकनाथ महाराज सद्गीर, डॉ. जयकृष्ण शिंदे आणि माजी नगरसेवक ह.भ.प. श्री. सकपाळ

ठाणे, १ ऑगस्ट (वार्ता.) – येथील श्री ज्ञानदेव सेवा मंडळ, ठाणे यांच्या वतीने सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांचा सत्कार करण्यात आला. श्री. वर्तक यांनी श्री ज्ञानदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांची ३१ जुलै या दिवशी सदिच्छा भेट घेतली. त्या वेळी हा सत्कार केला गेला. या वेळी पुरोगामी संघटना, काही सुपारीबाज पत्रकार आणि तपासयंत्रणांतील काही अधिकारी सनातन संस्थेची कशा पद्धतीने अपकीर्ती करत आहेत, याविषयी श्री. वर्तक यांनी उपस्थितांना सांगितले.

सनातन संस्थेवरील अत्याचारांविषयी जाणून घेतल्यावर श्री ज्ञानदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष, तसेच विश्‍व हिंदु परिषदेचे ठाणे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. एकनाथ महाराज सद्गीर म्हणाले, हा विषय सर्वांपर्यंत पोचणे आवश्यक आहे. आम्ही कीर्तनकारांच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करू. तसेच आपण दिलेल्या कागदपत्रांच्या छायांकित प्रती काढून आम्ही सर्वांना वाटू, तसेच तुम्हाला सर्व सहकार्य करू.

याप्रसंगी श्री ज्ञानदेव सेवा मंडळाचे उपाध्यक्ष श्री. विजय घोसाळकर, डॉ. जयकृष्ण शिंदे आणि माजी नगरसेवक ह.भ.प. सकपाळ उपस्थित होते. सनातन संस्थेने आम्हाला भेटून भूमिका मांडल्याने आनंद झाल्याचे सर्वांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Read more on Sanatan Sanstha

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *