Menu Close

देवबंद (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून मंदिरातील मूर्तीची तोडफोड !

चर्चवर कथित दगडफेक झाली, तरी बातम्या देणारी ढोंगी निधर्मीवादी प्रसारमाध्यमे अशा बातम्या देत नाहीत, हे लक्षात घ्या ! उत्तरप्रदेश भारतात आहे कि पाकिस्तानमध्ये ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

देवबंद (उत्तरप्रदेश) : येथील एका मंदिरातील मूर्तीचे सादिक नावाच्या २१ वर्षांच्या तरुणाने हातोड्याचे घाव घालून भंजन केल्याने येथे तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी सादिक याला अटक केली आहे. त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. मूर्ती तोडफोडीमुळे संतप्त झालेल्या जमावाने येथील एका मशिदीची भिंत आणि प्रवेशद्वार पाडले अन् येथे जाळपोळ केली. पोलीस आणि प्रशासन यांनी रात्रीच ही भिंत आणि प्रवेशद्वार बांधून दिले. (पोलीस आणि प्रशासन यांनी अशी तत्परता मंदिरातील मूर्तीविषयी का दाखवली नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

पोलिसांनी मूर्ती तोडफोडीच्या संदर्भात ६ जणांवर, तर मशिदीच्या प्रकरणी १५ ते २० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर खासदार राघव लखन पाल शर्मा यांनी दोषींवर कारवाई न झाल्यास ३१ जुलैला मंदिर परिसरात महापंचायत बोलावण्याची घोषणा केली आहे, तर काँग्रेसच्या आमदाराने मशिदीची तोडफोड करणार्‍यांच्या विरोधात २ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे. भाजपचे नगराध्यक्ष गजराज राणा यांनी सांगितले की, महापंचायतीच्या आयोजनासाठी प्रशासनाकडे अनुमती मागण्यात आली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *