-
मुसलमान कर्मचार्यांनी विरोध केल्यावरून हिंदु कर्मचार्याचेही प्रत्युत्तर, आस्थापनाकडून मात्र हिंदु कर्मचार्यावरच कारवाई
-
विमाननगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट

पुणे – येथील विमाननगर परिसरातील ‘कॉन्सेंट्रिक्स’ या नामांकित बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान आस्थापनात हिंदु कर्मचार्यासमवेत धार्मिक भेदभाव झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हिंदु धार्मिक चिन्हे (रुद्राक्ष) वापरल्याच्या कारणावरून पवन कुमार गोपाळराव बागडे या हिंदु कर्मचार्याला कामावरून काढून टाकण्यात आले. पवन कामावर असतांना गिनी, दिनाज, नूरन, आसिफ, इव्हान आणि मोहसीन या सहकर्मचार्यांनी त्यांच्यासमवेत धार्मिक भेदभाव केला होता. या प्रकरणी पीडित कर्मचार्याने विमाननगर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार प्रविष्ट केली.
काय आहे प्रकरण ?
१. पवन कुमार बागडे यांनी २६ जानेवारी या दिवशी या आस्थापनात काम चालू केले होते. आस्थापनातील प्रशिक्षणाच्या वेळी आणि कामाच्या ठिकाणी त्यांना गळ्यात रुद्राक्ष घालण्यास व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकार्यांनी वारंवार मज्जाव केला. ‘ड्रेस कोड’चे (पेहरावाच्या नियमावलीचे) कारण पुढे करण्यात आले; मात्र यासंदर्भात कोणतीही लेखी नियमावली दाखवण्यात आली नाही.
२. पवन यांनी सांगितले की, त्यांचा ‘प्रोबेशन पिरियड’ (मूल्यमापनाचा कालावधी) व्यवस्थित पूर्ण झाला होता. कामाच्या ठिकाणी होणार्या भेदभावाविरुद्ध त्यांनी आस्थापनातील अधिकारी गिनी, दिनाज, नूरन, आसिफ, इव्हान आणि मोहसीन यांच्या विरोधात व्यवस्थापनाकडे रीतसर तक्रार नोंदवली होती; मात्र व्यवस्थापनाने संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी उलट पवन कुमार यांच्यावरच नोकरी सोडण्यासाठी दबाव आणला आणि शेवटी त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले.
३. पवन यांनी या अन्यायाविरुद्ध १२ जूनला सामाजिक माध्यमावर व्हिडिओ पोस्ट करून आवाज उठवला. यानंतर आस्थापनाने त्यांना थेट ‘टर्मिनेशन लेटर’ (कामावरून काढल्याचे पत्र) दिले. ‘पवन यांच्यामुळे एका विशिष्ट धर्माच्या लोकांच्या भावना दुखावल्या आहेत’, असे कारण आस्थापनाने अधिकृतपणे या पत्रात नमूद केले आहे. स्वतः पीडित असतांना आणि ८ मे या दिवशी विमाननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली असतांनाही आस्थापनाने ही पक्षपाती कारवाई केली.
४. एका बाजूला इतर धर्मांच्या कर्मचार्यांच्या सवलतींची काळजी घेतली जात असतांना हिंदु सण, पारंपरिक दिवस आणि धार्मिक आचरण यांकडे दुर्लक्ष करत दबाव आणला जात असल्याचा आरोप पवन यांनी केला.
पीडित कर्मचार्याची व्यथा !
माझ्या वडिलांनी भारतीय सैन्यदलात २२ वर्षे देशसेवा केली आहे; मात्र आज स्वतःच्याच देशात हिंदु धार्मिक ओळख बाळगल्याने मला छळाला सामोरे जावे लागत आहे, अशी खंत पवन यांनी व्यक्त केली.
‘कॉर्पोरेट जिहाद’च्या अशा घटना सातत्याने समोर येत असल्याने आता सरकारने यावर कायदा करणे काळाची आवश्यकता ! – संपादक, हिंदू जनजागृती समिती
ही केवळ एका पवन कुमार बागडे यांची समस्या नसून कॉर्पोरेट विश्वातील हिंदुविरोधी मानसिकतेचे लक्षण आहे. बहुराष्ट्रीय आस्थापनांनी हे लक्षात ठेवावे की, ते भारताच्या भूमीवर व्यवसाय करत आहेत. त्यामुळे बहुसंख्य हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवण्याचा अधिकार त्यांना कुणीही दिलेला नाही. पोलिसांनी केवळ तक्रार नोंदवून न थांबता संबंधित व्यवस्थापनावर कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, तरच अशा प्रवृत्तींना आळा बसेल ! – संपादक, हिंदू जनजागृती समिती







