Menu Close

चिन्मय कृष्ण दास यांना बांगलादेश उच्च न्यायालयाकडून ४ पैकी २ गुन्ह्यांत जामीन

इस्कॉनचे नेते चिन्मय कृष्ण दास

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील उच्च न्यायालयाने इस्कॉनचे चिन्मय कृष्ण दास यांना त्यांच्यावर प्रविष्ट असलेल्या ४ गुन्ह्यांपैकी २ गुन्ह्यांमध्ये जामीन संमत केला आहे. न्यायालयाने उर्वरित २ गुन्ह्यांतील जामीन अर्जांवर सुनावणीसाठी १६ ऑगस्टचा दिनांक निश्चित केला आहे.

चिन्मय कृष्ण दास यांच्यावर हत्येचा प्रयत्न, तोडफोड, सरकारी कामात अडथळा आणणे, यांसह अनेक आरोपांखाली ४ गुन्हे प्रविष्ट आहेत. यापूर्वी गेल्या वर्षी ३० एप्रिल या दिवशी उच्च न्यायालयाने त्यांना देशद्रोहाच्या प्रकरणात जामीन संमत केला होता; मात्र नंतर बांगलादेशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अपील खंडपिठाने त्या आदेशाला स्थगिती दिली होती.

तस्लिमा नसरीन काय म्हणाल्या ?

कोलकाता येथे पत्रकारांशी बोलतांना बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन म्हणाल्या की, सरकारने त्यांना का अटक केली ?, हे आम्हाला ठाऊक नाही. माझे असे मानणे आहे की, ते बांगलादेशातील हिंदु समुदायाला एकत्रित करत होते आणि हेच त्यांच्या अटकेचे कारण असू शकते.

Latest News